सेनगाव पोलिस

“नागरिकांचा विश्वास जिंका”; सेनगाव पोलिसांना एसपी डॉ. निलाभ रोहन यांचे मार्गदर्शन

Sengaon Police: हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सेनगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला व नागरिकांच्या समस्या समजून घेत विविध सूचना दिल्या.

“नागरिकांचा विश्वास जिंका”; सेनगाव पोलिसांना एसपी डॉ. निलाभ रोहन यांचे मार्गदर्शन

Sengaon Police

सेनगाव (Sengaon Police) : “पोलिस दल हे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारे यंत्र नसून नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने न्याय देण्याचा प्रयत्न करा,” असे मार्गदर्शन हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सेनगाव पोलिस स्टेशनच्या भेटीदरम्यान केले. शनिवारी दि. ९ मे डॉ. निलाभ रोहन यांनी सेनगाव पोलिस स्टेशनला अचानक भेट देत येथील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी पोलिस ठाण्यातील दैनंदिन नोंदी, प्रलंबित गुन्हे, तपासाची स्थिती, ऑनलाईन पोर्टलवरील अर्ज, संवेदना पोर्टलवरील तक्रारी, नागरिकांशी संवाद व्यवस्था आदी बाबींची बारकाईने पाहणी केली.

संवेदना पोर्टलवरील तक्रारींची थेट सुनावणी

भेटीदरम्यान पोलिस अधीक्षकांनी संवेदना पोर्टलवरील अर्जदार व गैरअर्जदार यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या समस्या समजून घेत काही अर्ज तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. तक्रारदारांना वेळेवर प्रतिसाद मिळणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना

सेनगाव परिसरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांनी वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक ठिकाणांची ओळख करून तेथे जनजागृती, वाहन तपासणी आणि नियमभंगाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. “अपघात कमी करणे ही केवळ मोहीम नसून जीव वाचविण्याची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

गुन्ह्यात शिक्षा प्रमाण वाढविण्यावर भर

गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच आरोपींना न्यायालयातून शिक्षा होणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी तपास अधिक शास्त्रशुद्ध व पुराव्यांवर आधारित करण्याच्या सूचना दिल्या. तपासातील त्रुटी टाळून वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अधिकारी-अंमलदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या

यावेळी (Sengaon Police) पोलिस अधीक्षकांनी अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र संवाद बैठक घेत त्यांच्या कामातील अडचणी, सुविधा व आवश्यक बाबी जाणून घेतल्या. पोलिस कर्मचाऱ्यांवर वाढणारा ताण लक्षात घेऊन कामकाज अधिक सुसूत्र करण्याबाबत चर्चा झाली.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

सेनगाव पोलिस स्टेशनच्या (Sengaon Police) कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे पोलिस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या भेटीमुळे सेनगाव पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीला अधिक गती मिळणार असून नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार पोलिस प्रशासनासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू

Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू

Sep 27, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी

Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर

Sep 24, 2026