हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court

 

चोरट्यांचे पोलिसांना खुलेआम आव्हान

हिंगोली (Hingoli District and Sessions Court) : जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात तारखेला आलेल्या चोरट्यांनी चक्क बॅटर्‍या चोरून नेल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते ११.३० दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयात काही जण तारखेवर आले होते. त्यांनी न्यायालयाच्या जनरेटर यार्डमध्ये जाऊन चक्क २०० एम्पीएअरच्या दोन बॅटर्‍या व बॅटरी टर्मिनल वायर व टर्मिनल नटबोल्ट असे साहित्य चोरून नेले. विशेष म्हणजे ही बाब काही जणांच्या निर्दशनास येताच एकच गोंधळ उडाला. याबाबतची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. 

सदर प्रकरणात (Hingoli District and Sessions Court) हिंगोली शहर पोलिसात जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपीक शैलेश रणसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३६ हजारांच्या बॅटर्‍या चोरीस गेल्या प्रकरणी अज्ञात दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे या चोरी बाबत एक वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत होती. तारेखला आलेल्या चोरट्यांनी या बॅटर्‍या चोरून नेल्या. ज्यामध्ये तिघेजण पळाले तर दोन जण हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.