हिंगोली जिल्हा न्यायालय चोरी

स्थानिक गुन्हे शाखेच्या आयत्या पिठावर रेघोट्या: म्हणे बॅटर्‍या चोरीत दोघांना पकडले

Hingoli District Court Theft:

स्थानिक गुन्हे शाखेच्या आयत्या पिठावर रेघोट्या: म्हणे बॅटर्‍या चोरीत दोघांना पकडले

Hingoli District Court Theft

हिंगोली (Hingoli District Court Theft) : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जनरेटर यार्डमधील ३६ हजार रुपयाच्या दोन बॅटर्‍यासह इतर साहित्य चोरीस गेले होते. सदर प्रकरणात गोंधळ उडाल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर या चोरीचा गुन्हा उघड केल्याचा आव आणून आयत्या पिठावर रेघोट्या मारल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. 

२९ सप्टेंबरला सकाळी ११.२० ते ११.३० च्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात आलेल्या चोरट्यांनी चक्क जनरेटर यार्ड मधील दोन बॅटर्‍यासह साहित्य असा एकुण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडालेला दोघांना हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी केल्याची बतावनी करून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले जात आहे. परंतु यामध्ये जेंव्हा चोरीची घटना घडली त्याच्या काही वेळामध्येच दोघांना हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतल्याची चर्चा न्यायालय परिसरात सुरू होती.

या प्रकरणात गुन्हे शाखेने रोहीत सुरेश काशिदे, राहूल अशोक धवसे रा.मस्तानशहा नगर हिंगोली या दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून चोरीतील दोन बॅटर्‍याही जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  एकीकडे हिंगोली जिल्ह्यात चोर्‍यांचे सत्र एका पाठोपाठ सुरू असताना त्यातील बोटावर मोजण्या इतके गुन्हे उघड होत आहेत. गंभीर चोर्‍या  उघड न करता हिंगोली शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना याच गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा उघड केल्याची बतावणी हा विषय मात्र शहरात चर्चेचा बनला आहे.