Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

तेजस बहुउद्देशिय संस्था

गरजू गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तेजस संस्थेने बजावले मानवतेचे कर्तव्य

Tejas Multipurpose Institute: कन्हानच्या सत्रापुरमध्ये, तेजस संस्थेने गरिब विद्यार्थ्यांना टी-शर्ट व बिस्किटे वाटप करून शिक्षणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.


गरजू गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तेजस संस्थेने बजावले मानवतेचे कर्तव्य

Tejas Multipurpose Institute: |

तेजस संस्थाकडून सत्रापुरमध्ये मुलांना टी-शर्ट व बिस्किटे वाटप 

कन्हान (तेजस बहुउद्देशिय संस्थे) : तेजस बहुउद्देशिय संस्थेव्दारे सत्रापुर येथील गरजु गरिब विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता टी-शर्ट व बिस्किट वाटुन त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण करून त्यांच्या शिक्षणाकरिता मदत सुरू करण्यात आले.

कन्हानच्या सत्रापुर येथे तेजस संस्थेने लहान मुलांचे बरोबर राष्ट्रगीत गाऊन त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना टी-शर्ट व बिस्किटे वाटुन मानवतेचे कर्तव्य बजावले. अरगुलेवार यांनी सांगितले की, तेजस संस्था कधीही असे कार्य करत नाही. ज्यामुळे आर्थिक नुकसान होईल, तो पैसा गरिबांच्या उन्नतीसाठी त्यांच्या आनंदासाठी वापरला जातो. आमचे प्रत्येक कार्य दिवाळी, ईद, ख्रिसमस सणा सारखे आहे आणि आम्ही आमचा आनंद त्यांच्या सोबत साजरे करतो आमची एक पोळीमध्ये त्यांच्या अर्धी पोळीचा भाग असतो, जर कोणी गाडगे बाबांच्या १० - कलमी कार्याकडे जगाचे लक्ष वेधले असेल तर ती केवळ तेजस बहुउद्देशीय संस्था आहे.

संस्थेचे दानशुर लोकही आहेत की ते गरिबांच्या उन्नतीसाठी कधीही मागे हटत नाहीत. (Tejas Multipurpose Institute): नागपुर जिल्ह्यातील सत्रापुर हा असा परिसर आहे. इकडचे लोक शिक्षणाला महत्त्व देत नाहीत कार ण त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी खूप संघर्ष करावा लागतो. शिक्षण आणि कोणत्याही आजारावरील उप चार हा एक व्यवसाय बनला आहे. सरकारी शाळा कुठेही दिसत नाहीत आणि गरीब लोक खाजगी शाळां च्या उंबरठ्यावर पाऊलही ठेवु शकत नाहीत. परंतु संस्थेचे उपाध्यक्ष देविदास पेटारे आणि समाजसेवक अर्जुन पात्रे यानी मुलांना शिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. हा संदेश देण्यास आणि या मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेजस संस्था व्दारे ही सर्व काही प्रर्यंत सुरू आहे.

देविदास पेटारे आणि अर्जुन पात्रे यांनी लवकरच अर्जुन पात्रे यांच्या अंगणात शाळा उघडुन या मुलांना शिक्षित करण्याची प्रतिज्ञा केली आहे. चंद्रशेखर अरगुलेवार संस्थाचे वरिष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ फाले आणि समाजिक कार्यकर्ता वीरू कडी खाये यांनीही आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवुन शाळा उघडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन जनते ला केले आहे. अरगुलेवार म्हटले की केंद्र आणि राज्या त दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मजबुत सर कार आहे. कन्हानचे राजकारणी नेते आणि नागपुर जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री आहेत. त्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. टी-शर्ट वाटप कार्यक्रमास  संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देविदा स पेटारे, मार्गदर्शक व पत्रकार एम.ए. जब्बार, सामा जिक कार्यकर्ते प्रशांत मसार, अर्जुन पात्रे, प्रीतम शेंडे,  आशिष इंचुलकर सह नागरिक उपस्थित होते.

Related to this topic: