Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर

भीषण अपघात गडचिरोली

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भयानक अपघात; 5 मृत, ६ गंभीर जखमी

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ वाहनाचा ट्रॅव्हल्सशी धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी आहेत.


गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भयानक अपघात 5 मृत ६ गंभीर जखमी

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर ट्रॅव्हल्सशी धडक; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गडचिरोली : लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 29 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता घडली.

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी 3 वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून  भाडभीडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची टार्निंग वर जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: