Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

'देऊळ बंद 2

'देऊळ बंद 2' ठरला ब्लॉकबस्टर! चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांची 'दैनिक देशोन्नती'ला सदिच्छा भेट

Deool Band 2: शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आळा बसावा, या हेतूने निर्माण केलेला 'देऊळ बंद-2' हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलास वाणी


देऊळ बंद 2 ठरला ब्लॉकबस्टर चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांची दैनिक देशोन्नतीला सदिच्छा भेट

Deool Band 2 |

 

'देऊळ बंद-2' चित्रपट आवर्जून बघा: प्रवीण तरडे

'देऊळ बंद-2' या चित्रपटाला शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या शुभेच्छा

नागपूर (Deool Band 2) : शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जबाजारीपणा, मुलांच्या शिक्षणाची व दररोजच्या उदरनिर्वाहाची चिंता, यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. परंतु, आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आळा बसावा, या हेतूने निर्माण केलेला 'देऊळ बंद-2' हा (Deool Band 2) चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde), निर्माते कैलास वाणी (Kailas Vani) यांनी आज बुधवारी दैनिक देशोन्नतीला दिलेल्या सदिच्छा भेटीत केले.

सर्वप्रथम दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी लेखक-दिग्दर्शक व निर्मात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर या (Deool Band 2) चित्रपटाविषयी सविस्तर चर्चा केली. हा चित्रपट नक्की बघेल व त्यानंतर माझ्या भावना कळवेल, असे मत प्रकाश पोहरे यांनी व्यक्त करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकर्‍यांच्या समस्यांवर जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, या सदिच्छा भेटीदरम्यान देशोन्नती डिजिटलचे विभाग प्रमुख (Aniket Patil) अनिकेत पाटील यांनी या (Deool Band 2) संपूर्ण चित्रपट चमूची एक विशेष आणि सविस्तर मुलाखत घेतली. ज्यामध्ये चित्रपटाचा रंजक प्रवास आणि अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde), निर्माते कैलास वाणी (Kailas Vani), नागपूरचे अभिनेते मुकुंद वसुले व साऊंड डिझायनर संकेत घोटकर, अनुप गोरे प्रामुख्याने उपस्थित होते. 

देऊळ बंद-2: 
आत्महत्या केल्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाही. शेतकर्‍यांच्या विचारांत बदल करण्याची गरज आहे. असा संदेश या (Deool Band 2) चित्रपटातून दिला आहे. या चित्रपटात स्वामी समर्थ शेतकरी महिलेसोबत, शेतात, दर्‍याखोर्‍यामध्ये, एसटीने प्रवास करून तिचे समुपदेशन करतात. मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे. तर प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी बोगस बियाणे विक्रेत्याची भूमिका साकारली आहे. बियाणे खरेदी करताना शेतकरी कसे फसवले जातात, याचे उत्तम उदाहरण या चित्रपटात बघावयास मिळते.

तुकाराम (मंगेश देसाई) हा एक गरीब शेतकरी आहे. तो स्वामी समर्थाचा निस्सीम भक्त आहे. मात्र परिस्थितीमुळे तो हतबल होतो आणि हताश होऊन देवळाला कुलूप लावून निघून जातो. तुकारामाची पत्नी संगीता (स्नेहल तरडे) नास्तिक बनलेली महिला आहे. आपल्या कुटुंबाला आणि शेतकर्‍याना होणारा त्रास पाहून ती थेट देवळाच्या (स्वामी समर्थांच्या) अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करते, अशी या चित्रपटाची कथा आहे.

कष्ट व कर्मावर विश्वास ठेवा: 

मी माझ्या कर्मावर व कष्टावर विश्वास ठेवल्यानेच या (Deool Band 2) चित्रपटाला प्रचंड यश लाभत आहे, अशी भावना लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली. गेल्या वीस दिवसात या चित्रपटाने 70 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईतील काही भाग हा शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल, अशी कबुली दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी दिली. नागपूरचे अभिनेते मुकुंद वसुले यांनी या चित्रपटात गाडीवानाची छोटी भूमिका साकारली असल्याचे सांगितले. तर, शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांची उत्तरे या चित्रपटात बघावयास मिळते, असे निर्माते कैलास वाणी (Kailas Vani) यांनी सांगितले. 

Related to this topic: