Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > महाराष्ट्र

लॉकडाऊन 2.0

सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?

Lockdown 2.0: देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना नागरिकांना विनाकारण घाबरू नये असे सांगितले.


सावधाननाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार

Lockdown 2.0 |

लॉकडाऊनच्या अफवांवर फडणवीसांचा इशारा; “घाबरू नका, राज्यात सर्व काही सुरळीत”

नवी दिल्ली/मुंबई (Lockdown 2.0) : देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा पसरत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. विनाकारण अफवा पसरवू नयेत, अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अफवांमुळे घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणत्याही प्रकारची घाबराट निर्माण करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आजूबाजूच्या काही देशांमध्ये (Lockdown 2.0) शटडाऊनसदृश परिस्थिती असली तरी भारतात केंद्र सरकारने योग्य नियोजन केल्यामुळे पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता भासू दिलेली नाही. सध्या देशात सुमारे एक महिन्याचा पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, नागरिकांनी विनाकारण इंधनाची साठवणूक करू नये, अन्यथा कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. नेहमीप्रमाणेच गरजेनुसार इंधन भरावे, असे आवाहन (Devendra Fadnavis) त्यांनी केले.

याशिवाय, कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा 40 टक्क्यांपर्यंत सुधारला असून परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताची कूटनीती यशस्वी ठरत असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा (Devendra Fadnavis) त्यांनी व्यक्त केली.

Related to this topic: