Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > महाराष्ट्र

डॉ. शिवनाथ कुंभारे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

Dr. Shivnath Kumbhare: गडचिरोलीत, ज्येष्ठ समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

Dr. Shivnath Kumbhare |

गडचिरोली जिल्ह्यात शोककळा 

गडचिरोली (Dr. Shivnath Kumbhare) : झाडीपट्टी प्रदेशातील ज्येष्ठ समाजसेवक, विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आणि अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे आज दुपारी ११ वाजता गडचिरोली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. कुंभारे (Dr. Shivnath Kumbhare) हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निष्ठावंत अनुयायी होते. त्यांनी त्यांच्या परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आयुष्यभर अविरत कार्य केले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कार्यतत्परतेमुळे अनेकांना प्रेरणा व दिशा मिळाली. त्यांनी कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य तसेच अण्णा हजारे  यांच्यासोबत अनेक वर्षे सामाजिक कार्य केले. दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी भागात जाऊन त्यांनी लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते . वैद्यकीय सेवा आणि लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये त्यांनी तब्बल ५० वर्षे योगदान दिले.

गडचिरोली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, झाडीबोली साहित्य मंडळ, दारूबंदी आंदोलन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती यांसारख्या विविध संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, साहित्यिक आणि जनआंदोलन क्षेत्रात शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Related to this topic: