Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली येलो गोल्ड

हिंगोलीचे पिवळे सोने आता जागतिक ब्रँडकडे, आरोग्य मंत्र्यांना हिंगोली येलो गोल्ड भेट

Hingoli Yellow Gold: हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन केल्याने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून दिले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना हळदीचे उत्पादन भेट देण्यात आले.


हिंगोलीचे पिवळे सोने आता जागतिक ब्रँडकडे आरोग्य मंत्र्यांना हिंगोली येलो गोल्ड भेट 

Hingoli Yellow Gold |

हिंगोली (Hingoli Yellow Gold) : हिंगोली जिल्ह्याची ओळख आता केवळ धार्मिक आणि ऐतिहासिक कारणांसाठीच उरली नसून, हळदीचा जिल्हा म्हणून हे नाव जागतिक नकाशावर झळकू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, हिंगोली जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता बचत गटांनी हळदीपासून तयार केलेल्या उत्पादनांचे हिंगोली येलो गोल्ड भेट  या ब्रँडचे खास गिफ्ट संच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना ९ एप्रिल गुरुवार रोजी संभाजी नगर येथे  प्रदान करण्यात आले.

​छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित  माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान विभागीय कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य सेवा बाबत माहिती देत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी मेहनतीने तयार केलेल्या हळद उत्पादनांचा संच 'गिफ्ट स्वरूपात देऊन हिंगोलीच्या हळदीची महती पटवून दिली.

यावेळी कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अकोलेचे आ. डॉ. किरण लहामटे, आ. प्रदीप जैसवाल, आ. प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, एमआयटीचे संचालक मनीष शर्मा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​हिंगोली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आता केवळ कच्च्या मालाची विक्री न करता, त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये ​महिला बचत गट ग्रामीण भागातील महिला नवनवीन प्रयोगातून हळद उद्योगाला गती देत आहेत. (Hingoli Yellow Gold) जागतिक बाजारपेठेसाठी दर्जेदार उत्पादन तयार करत आहेत.​हिंगोलीच्या हळदीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणेसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड सहकार्य करीत आहेत.

Related to this topic: