Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पेट्रोल पंप

कुरुंदा येथे पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगाच रांगा

Petrol Crisis: कुरुंदा येथे अफवामुळे पेट्रोल व डिझेल संपण्याच्या भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या, पोलिसांनी व्यवस्था सांभाळली.


कुरुंदा येथे पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगाच रांगा  

Petrol Crisis |

कुरुंदा (Petrol Crisis) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील दोन्हीही पेट्रोल पंपावर  रात्री अचानक गावात अफवा झाली की, (Petrol Crisis) पेट्रोल, डिझेल बंद होणार आहे.अशी  वाऱ्यासारखी अफवा पसरताच. कुरुंदा व परिसरातील  नागरिकांनी  डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी व  नेण्यासाठी  पेट्रोल पंपावर रांगा लावल्याने एकच खळबळ उडाली.

दुचाकी व चार चाकी, ट्रॅक्टर  वाल्यांनी 35 लिटर  कॅन, ट्रॅक्टर टाली मध्ये दोनशे लिटर  टाकी  घेऊन ट्रॅक्टर वाले पेट्रोल पंपावर दाखल झाले होते. दोचाकी वर दोन-दोन कॅन घेऊन  मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी पाहायला आली. त्यामुळे पेट्रोल पंपावर (Petrol Crisis) तोबा तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामदास निरदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  बंदोबस्त लावण्यात  आला होता.

कोणताही अनुचित प्रकार घडून नाही याकरिता सर्व नागरिकांना रांगा धरून व्यवस्थित पेट्रोल डिझेल देण्यात आले.काही नागरिकांना डिझेल व  (Petrol Crisis) पेट्रोल भेटले नाही त्यामुळे घराकडे रिकाम्या कॅन  घेऊन जावे लागले. एकच विषय  चर्चेचा  बनला  पेट्रोल डिझेल, पेट्रोल डिझेल आता हळदी काढनी व  गव्हाचे हरभऱ्याचे मळणी यंत्र चालू असल्यामुळे तसेच  शेतातल्या ट्रॅक्टर द्वारे  सर्वमशागती चालू आहेत त्यामुळे डिझेलची अत्यंत गरज असल्यामुळे पेट्रोल पंपावर रंगाच रांगा पहावयास मिळाल्या. 

Related to this topic: