Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > महाराष्ट्र

डॉलर 100 रुपये

डॉलर 100 रुपयांवर गेला तर मोदींचा सत्कार करणार!

100 Rs Per Dollar: ज्या दिवशी एका डॉलरची किंमत 100 रुपये होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू,” अशी खोचक मागणी सावजी यांनी पत्रातून केली आहे.


डॉलर 100 रुपयांवर गेला तर मोदींचा सत्कार करणार

100 Rs Per Dollar |

 

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे पंतप्रधानांना उपरोधिक पत्र चर्चेत

नवी दिल्ली/ मुंबई (100 Rs Per Dollar) : देशातील वाढती महागाई, घसरता रुपया आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी (Subodh Sawji) यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिलेल्या उपरोधिक पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. “ज्या दिवशी एका डॉलरची किंमत 100 रुपये (100 Rs Per Dollar) होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू,” अशी खोचक मागणी सावजी यांनी पत्रातून केली आहे. यासाठी वेळ आणि तारीख द्यावी, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

सुबोध सावजी (Subodh Savaji) यांनी पत्रात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की, “भारताच्या अर्थव्यवस्थेत डॉलर 100 रुपयांवर (100 Rs Per Dollar) पोहोचणे हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल. आपल्या ‘विश्वगुरू’ नेतृत्वाखाली हा बहुमान देशाला मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.” याचबरोबर त्यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली आहे. “देशात जातीयवाद, धर्मवाद आणि जुमलेबाजीच्या आधारावर सरकारे आणली जात आहेत, याचाही देशवासियांना अभिमान आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. 

पत्रात पुढे सावजी (Subodh Savaji) यांनी नमूद केले की, “जे काम 70 वर्षांत काँग्रेसला करता आले नाही, ते तुमच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. डॉलर 100 रुपयांवर (100 Rs Per Dollar) पोहोचल्यावर आम्ही आपल्या पदाला साजेसा जाहीर सत्कार दिल्लीत येऊन करू.” या पत्रामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका होत असताना भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: