Breaking News
  • विठ्ठल महाराज देहूकर यांच्यावर चंद्रभागा वाळवंटात अंत्यसंस्कार
  • अकोल्यात सिटी हॉस्पिटलला भीषण आग; रुग्णांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
  • शिवराज मोटेगावकराचे नवनवीन काळे कारनामे समोर, लातूरमध्ये अनधिकृत 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहितीसमोर
  • अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाघिरा फाट्यानजीक आज दुपारी 3.30 झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला
  • पनवेलमध्ये संतापजनक प्रकार! अमरधाम स्मशानभूमीत पाणीच नसल्याने मयतावर 'बिसलेरी'च्या पाण्याने विधी करण्याची नामुष्की
  • Accident News : अकोला-शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात.
  • Nashik: उष्णतेचा दूध डेअरी व्यवसायाला फटका; दूध खराब होऊन उखरड्यावर फेकण्याची वेळ
  • हिंगोलीत पेट्रोल डिझेलचा तुटवडा, शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले
  • फलटणमध्ये ‘कोयता गँग’ची दहशत; जिंती नाक्यावर तरुणांचा हैदोस

होम > महाराष्ट्र

शेअर बाजार घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण; दिग्गज गुंतवणूकदारांना मोठा फटका

Stock market decline: BSE Sensex आणि NIFTY 50 मध्ये गेल्या चार महिन्यांत ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री


शेअर बाजारात मोठी घसरण दिग्गज गुंतवणूकदारांना मोठा फटका

Stock market decline |

 

मात्र दमाणींची कमाई कायम

मुंबई (Stock market decline) : BSE Sensex आणि NIFTY 50 मध्ये गेल्या चार महिन्यांत 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल यामुळे केवळ सामान्य गुंतवणूकदारच नव्हे, तर देशातील दिग्गज ‘बिग बुल्स’नाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. आकडेवारीनुसार, अनेक नामांकित गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे. यामध्ये Hemendra Kothari आणि Mrunal Agrawal यांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या संपत्तीत तब्बल 26 टक्क्यांची घट झाली आहे.

हेमेंद्र कोठारी यांच्या पोर्टफोलिओमधील Alkyl Amines Chemicals, Sonata Software आणि EIH Associated Hotels या प्रमुख शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. त्यामुळे त्यांची संपत्ती 6033 कोटी रुपयांवरून 4482 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. दुसरीकडे Mukul Agrawal यांनी काही कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेतली असली, तरी त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 6250 कोटी रुपयांवरून 4648 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

अनुभवी गुंतवणूकदार Madhusudan Kela यांच्या पोर्टफोलिओमध्येही 21 टक्क्यांची घट झाली आहे. त्यांनी Indiabulls, Simplex Infrastructures आणि Aptech मध्ये नवीन गुंतवणूक केली असली, तरी त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 2084 कोटी रुपयांवरून 1643 कोटी रुपयांवर आले आहे. (Stock market decline) लहान गुंतवणूकदारांमध्ये तेजस त्रिवेदी यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक 33 टक्क्यांची घसरण झाली आहे. अनुज शेठ आणि गोविंदलाल पारीख यांनाही अनुक्रमे 18 आणि 14 टक्क्यांचा फटका बसला. तर युसुफअली कादर यांच्या संपत्तीत तुलनेने कमी म्हणजे 6 टक्क्यांची घट झाली आहे.

मात्र या सर्व मंदीतही Radhakishan Damani यांनी दमदार कामगिरी करत आपली मजबूत गुंतवणूक रणनीती कायम ठेवली आहे. DMart चे मालक असलेल्या दमाणी यांनी बाजारातील अस्थिरतेतही चांगला नफा कमावत इतर गुंतवणूकदारांपेक्षा वेगळी छाप पाडली आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारातील घसरणीमागे (Stock market decline) अनेक कारणे आहेत. 2025 अखेरपासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढण्यास सुरुवात केली. गेल्या तीन महिन्यांत जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यात आले. त्यातच कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल, अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे वाढलेले भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.