Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > महाराष्ट्र

नागपूर वाहतूक व्यवस्था

नागपूरमध्ये ‘लाल ब्लिंकर सिग्नल’ लागू; उष्णतेच्या लाटेत वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

Red blinker signal: नागपूरमध्ये दुपारच्या वेळी वाहतुकीची कमतरता लक्षात घेऊन, वाहतूक पोलिसांनी लाल ब्लिंकर सिग्नल सक्रिय केले आहेत. हे उष्णतेच्या लाटेदरम्यान सुरक्षिततेसाठी केले गेले आहे.


नागपूरमध्ये ‘लाल ब्लिंकर सिग्नल’ लागू उष्णतेच्या लाटेत वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

Red blinker signal |

नागपूर (Red blinker signal) : तीव्र उन्हाळा आणि दुपारच्या वेळेत कमी होणाऱ्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३१ प्रमुख चौकांवरील सिग्नल दुपारी २ ते ४ या वेळेत ‘लाल ब्लिंकर सिग्नल’वर चालवण्यात येणार आहेत. हा (Red blinker signal) निर्णय शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून सध्या नागपूरमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. कमी रहदारीच्या काळात सिग्नलवर अनावश्यक थांबावे लागू नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी काय बदलणार?

या (Red blinker signal) नव्या पद्धतीनुसार चालकांना नेहमीप्रमाणे सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढील सूचनांचे पालन करावे लागणार आहे:

? थांबा → निरीक्षण करा → पुढे जा
? वेग मर्यादा: २० किमी/तास

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही (Red blinker signal) कोणतीही सूट नसून उष्णतेच्या लाटेत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतलेला उपाय आहे. चालकांनी चौकात प्रवेश करताना वेग कमी ठेवणे, सर्व दिशांकडे लक्ष देणे आणि सावधगिरीने वाहन चालवणे आवश्यक आहे. निष्काळजीपणा किंवा अतिवेगाने वाहन चालवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन 

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “ब्लिंकर सिग्नलला मोकळा रस्ता समजू नका. चौक ओलांडण्यापूर्वी काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि वेग मर्यादा पाळा.” हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी घेतला असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण यादी: ब्लिंकर मोडवरील ३१ सिग्नल

१. लेडीज क्लब चौक
२. जीपीओ चौक
३. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौक
४. पोलीस तलाव टी-पॉइंट
५. व्हीसीए चौक
६. खामला चौक
७. हिस्लॉप कॉलेज चौक
८. राजा राणी चौक
९. बोर्ड ऑफिस चौक
१०. धरमपेठ वाय-पॉइंट
11. विवेकानंद नगर (हिंदुस्थान कॉलनी) चौक
१२. बोले पेट्रोल पंप चौक
१३. अहिंसा चौक
१४. अयोध्या देवी चौक
१५. टेलिफोन एक्सचेंज चौक
१६. आंबेडकर चौक
१७. कमल चौक
१८. डी.पी. रोड टी-पॉइंट
१९. टी.बी. वॉर्ड चौक
२०. पुरुषोत्तम बाजार चौक
२१. नेरी टी-पॉइंट
२२. बजाज नगर चौक
२३. जैताला बाजार चौक
२४. खामला चौक (अधिकृत टिपणीत पुन्हा उल्लेख)
२५. भेंडे लेआउट चौक
२६. देवनागर चौक
२७. गुरुदेव नगर चौक
२८. साखरदरा चौक
२९. संघर्ष नगर चौक
३०. १० नंबर पुलिया
३१. कामगार नगर चौक

Related to this topic: