Breaking News
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत
  • रत्नागिरी RTO ने 2025–26 मध्ये ₹128.54 कोटींचा विक्रमी महसूल जमा; शासनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र पाऊस इशारा

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ३ तासांत पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra rain warning: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आठ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत पाऊस पडण्याची दाट शक्यता. नागरिकांना व शेतकर्‍यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे.


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ३ तासांत पावसाचा इशारा नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra rain warning |

हिंगोली (Maharashtra rain warning) : अहिल्यानगर, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, परभणी, पुणे व सातारा या आठ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असा इशारा मंत्रालय, मुंबई येथून देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यावर तयार झालेल्या पोषक हवामानामुळे वरील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून, काही भागांत अचानक पावसाच्या सरी कोसळतील.

या (Maharashtra rain warning) पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबांजवळ उभे राहू नये. पावसासोबत वीज चमकत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

महावितरण, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन करावे, असेही कळविण्यात आले आहे. दरम्यान, उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेती व दैनंदिन कामांवर परिणाम होऊ नये यासाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.

Related to this topic: