Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

डॉ. जयसिंगराव पवार

तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला..

Dr. Jaisingrao Pawar: महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने राज्यात मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


तत्वनिष्ठ व्यासंगी इतिहास संशोधक हरपला

Dr. Jaisingrao Pawar |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

मुंबई (Dr. Jaisingrao Pawar) : ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला. अशा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पवार (Dr. Jaisingrao Pawar) यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली.



विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली. डॉ. पवार (Dr. Jaisingrao Pawar) यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले. यातून निर्माण झालेली ग्रंथसंपदा ही महाराष्ट्रासाठी संचित ठरणारे आहे.

डॉ. पवार (Dr. Jaisingrao Pawar) यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील व्यासंगी मार्गदर्शक हरपला आहे. ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने पवार तसेच त्यांच्या संशोधक विद्यार्थी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related to this topic: