Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

डॉ. जयसिंगराव पवार

महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Dr. Jaisingrao Pawar: ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात मोठी हानी उद्भवली आहे.


महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ जयसिंगराव पवार यांचे निधन

Dr. Jaisingrao Pawar |

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला: एकनाथ शिंदे

मुंबई (Dr. Jaisingrao Pawar) : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (Dr. Jaisingrao Pawar) यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले.

विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. जयसिंगराव पवार (Dr. Jaisingrao Pawar) यांनी केवळ इतिहास लिहिला नाही, तर तो पुराव्यांच्या आधारे जनमानसात रुजवला.

कोल्हापूरच्या मातीत राहून त्यांनी शिवकाल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जागतिक पातळीवर नेला. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्याचा आग्रह होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान देणारा एक दीपस्तंभ गमावल्याचे आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

Related to this topic: