Breaking News
  • SSC Result 2026: मुलींची पुन्हा आघाडी, कोकण अव्वल
  • कलिंगडातून विषप्रयोग? हत्या, अपघात की आत्महत्या – गूढ कायम
  • नाशिक TCS ‘कन्वर्जन’ प्रकरणात मोठी कारवाई; फरार निदा खान अखेर जेरबंद
  • नगरसेवकाच्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती निदा खान; राजकीय कनेक्शन उघड
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

होम > महाराष्ट्र

२ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर; सकाळी पत्रकार परिषद

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.


 २ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर सकाळी पत्रकार परिषद

HSC Result 2026 |

पुणे (HSC Result 2026) : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या या निकालाची अधिकृत घोषणा ऑनलाईन माध्यमातून केली जाणार असून, विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

दरम्यान, निकाल जाहीर करण्यापूर्वी यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पार पडणार आहे. या परिषदेत निकालाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

बारावीच्या निकालामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असून, विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Related to this topic: