Gadchiroli Dead Body: गडचिरोलीत 24 वर्षीय युवकाचा मृत्यू शारीरिक संबंधानंतर झाल्याची चर्चा. पोलिसांना संशयास्पद रक्तस्त्रावाचे कारण शोधावे लागणार.
खुल्या मैदानात शारीरिक संबंधानंतर मृत्यू झाल्याची चर्चा
गडचिरोली (Gadchiroli Dead Body) : शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयालगत मार्लीवार यांच्या खुल्या मैदानात काल 3 मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान मृत्यूपूर्वी 2 मे रोजी रात्री या युवकाने खुल्या मैदानात एका 'गे' व्यक्तीला बोलवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध केल्याची चर्चा शहरात पसरली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मृतकाने 2 मे च्या रात्री येथील बस स्थानक परिसरात वावरत असलेल्या (Gadchiroli Dead Body) एका 'गे'व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बोलावले होते. त्यांच्यात शारीरिक संबंध देखील झाल्याची माहिती आहे. मात्र नंतर हा युवक बेशुद्ध पडल्याने घटनास्थळावरून त्या 'गे' व्यक्तीने पोबारा केला. पोलिसांनी मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदन देखील केले आहे. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप पर्यंत अप्राप्त आहे.
मृतक युवकाच्या नाकातून, तोंडातून व गुप्त अवयवाच्या ठिकाणावरून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले आहे. मात्र (Gadchiroli Dead Body) शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत .यामुळे मृत्यूचे कारण संशयास्पद असून नाकातून तोंडातून व गुप्त ठिकाणाहून रक्तस्त्राव का झाला, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करून मृतदेह मैदानात फेकल्याचा संशय काल व्यक्त केला होता. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी येऊन सखोल तपास केला. घटनास्थळी कोणतेही हत्यार किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, मृतकाची दुचाकी वाहन चावी लावलेल्या अवस्थेत आढळून आली. (Gadchiroli Dead Body) शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच, या युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होणार आहे.