Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > महाराष्ट्र

माओवादी आत्मसमर्पण

गडचिरोलीत ९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण; पोलीस व सीआरपीएफला मोठे यश

Gadchiroli Maoist Surrender: गडचिरोलीत, ९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये ३ एसीएम आणि ६ सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एके-४७ व कार्बाईनसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.


गडचिरोलीत ९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण पोलीस व सीआरपीएफला मोठे यश

Gadchiroli Maoist Surrender |

३ एसीएमसह ९ जणांचा शरणागतीचा निर्णय; ३० लाखांचे बक्षीस जाहीर असलेले माओवादी

गडचिरोली (Gadchiroli Maoist Surrender) : जिल्ह्यात माओवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत ९ वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ एसीएम (एरिया कमिटी सदस्य) पदावरील माओवाद्यांसह इतर ६ सदस्यांचा समावेश असून, त्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण केलेल्या (Maoist Surrender) माओवाद्यांमध्ये दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको, रामजी अडमा पोटाम, शांती वंजा वड्डे यांच्यासह इतर सहा सदस्यांचा समावेश आहे. यापैकी शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल व ३० जिवंत काडतुसांसह, तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह आत्मसमर्पण केले.

एके-४७ व कार्बाईनसह शस्त्रसाठा जप्त; २०२५ पासून आतापर्यंत १३२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

आत्मसमर्पित माओवाद्यांकडून (Maoist Surrender) मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात एके-४७ रायफल, मॅगझीन, ५७ जिवंत काडतुसे, वॉकीटॉकी, बॅटऱ्या व पेनड्राईव्हचा समावेश आहे. तसेच अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एसएलआर रायफल, डेटोनेटर व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद (Gadchiroli Maoist Surrenderआता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, सध्या तो केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागातच मर्यादित राहिल्याचे पोलिसांनी सांगितले. शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आणि पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे अनेक माओवादी मुख्य प्रवाहात येत आहेत.

विशेष म्हणजे, २०२५ पासून आतापर्यंत एकूण १३२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण (Maoist Surrender) केले असून, २०२२ पासून हा आकडा १६६ वर पोहोचला आहे. एकूणच, आजपर्यंत ८०५ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर शरणागती पत्करली आहे. या कार्यक्रमाला सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने ही कारवाई यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related to this topic: