Breaking News
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो
  • आता बँक बदला सहज; बँक बदलताना अकाउंट नंबर बदलणार नाही
  • आनंदाची बातमी: 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार
  • रोहितने धडाकेबाज फलंदाजीने रचला सर्वात जलद IPL विक्रम
  • 'केरळम'मध्ये कमळ फुलणार; LDF आणि UDF दोन्ही भ्रष्टाचारी
  • गडचिरोलीत उद्योगांसाठी जमीन अधिग्रहणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

ई-केवायसी मुदतवाढ

महिलांसाठी ई-केवायसी मुदतवाढीची अंतिम संधी

अकोला येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची मुदत ३१ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला.


महिलांसाठी ई-केवायसी मुदतवाढीची अंतिम संधी

३१ एप्रिलपर्यंत अंतिम संधी
ई-केवायसीअभावी थांबलेला लाभ पुन्हा मिळण्याची शक्यता


अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती, मात्र आता लाभार्थी महिलांना ३१ एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने जुलै २०२४ पासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांना डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, ३१ मार्च ही अंतिम मुदत संपल्यानंतर अनेक महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही मुदतवाढ अंतिम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, दिलेल्या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना पुढील काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: