Dr. Pragya Satav: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Dr. Pragya Satav |
हिंगोली (Dr. Pragya Satav) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी होणाऱ्या (Maharashtra Legislative Council) पोटनिवडणुकी करिता भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Dr. Pragya Satav) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी जि. प उपाध्यक्ष मिलींद यंबल, पुष्कराज सातव, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे यांची उपस्थिती होती.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज त्यांनी हा अर्ज दाखल केला.यावेळी विधानभवनात डॉ. प्रज्ञाताई (Dr. Pragya Satav) सोबत भागवत चव्हाण, महेश गोविंदवार, रुपेश कदम, शेरसिंग बावरी, उमाकांत शेवाळकर, निहाल कुरेशी, हर्षवर्धन वाघमारे, विरभद्र महाजन, नामदेव चव्हाण, पंकज जाधव, भगवान शिंदे,दरक, केशवराव मस्के, कैलाश मोरे आणि इतर वरिष्ठ नेते, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.