Breaking News
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त

होम > महाराष्ट्र

हिंगोली भाजप विजयी

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष

Hingoli BJP wins: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या विजयाचा हिंगोलीत फटाके फोडून आणि मिठाई वाटून साजरा केलेला जल्लोष. विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या.


भाजपच्या विजयाचा हिंगोलीत फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष

Hingoli BJP wins |

हिंगोली (Hingoli BJP wins) : देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये घवघवीत यश मिळवले असून, पाँडिचेरी मध्येही मित्र पक्षासह जोरदार कामगिरी केली आहे.भाजपाला मिळालेल्या या यशाचा हिंगोलीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जल्लोष साजरा केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या (Hingoli BJP wins) विजया नंतर शहरातील गांधीचौक येथे भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमून विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी ढोल ताश्याचा गजरात फटाके फोडून आणि झालमुरी आणि रसगुल्ला मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.'हा विजय जनतेचा भाजपवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने आपली पकड मजबूत केली आहे, तर पश्चिम बंगालमध्येही पक्षाने अभूतपूर्व मुसंडी मारली आहे, असे मत यावेळी भाजपा नेत्यांनी व्यक्त केले.

यावेळी विरकुंवर अण्णा,  नगरसेवक उमेश गुठ्ठे, हमीद प्यारेवाले, अजय गायकवाड, के.के शिंदे, जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, अंकुश आहेर, गोल्डी सोनी, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, क्रिष्णा  रुहाटिया, मिरा सुर्यवंशी, लखन कुरील, अमित रुहाटिया, मनोज शर्मा, संजय ढोके, बाबाराव घुगे, माणिक लोढे, सुनिल भुक्तर, रमेश कर्‍हाळे, रमेश पाटील जाधव, उत्तमराव जगताप विश्वास बांगर, सचिन शिंदे, कैलाश श्रीनाथ, संदीप वाकडे, नितीन राठौर, राजेंद्र हलवाई, समिर भिसे, महेश शहाणे, अशिष शर्मा, संजय खंडेलवाल, अंकुश जैस्वाल, गुड्डू देवकते, सुमंत नायक, योगेश घन, जय घोडे, चांदु लांडगे, आनंद सातपुते यांच्यासह या जल्लोषात भाजपचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Related to this topic: