Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > महाराष्ट्र

आमदार संजय गायकवाड

आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी

MLA Sanjay Gaikwad: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. राज्यभरात संताप उसळला आहे, परंतु नांदेडमध्ये विरोधी पक्ष सुस्त.


आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी

Prashant Ambi |

राज्यात संतापाची लाट, पण नांदेडचे विरोधी पक्ष सुस्त!

-पवन जगडमवार

नांदेड (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा एका गंभीर वादामुळे चर्चेत आले आहेत. 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना, नांदेडमधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकाच्या शीर्षकावरून संतापलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी आंबी यांना फोन केला. या संभाषणादरम्यान आमदारांनी (MLA Sanjay Gaikwad) अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आंबी यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अश्लील भाष्येत शिवीगाळ आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या धमकीमध्ये त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ दिला. काॅम्रेड गोविंद पानसरेंचे काय हाल झालेत हे माहिती नाही का?"अशा शब्दांत त्यांनी आंबी यांना धमकावले. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन करणाऱ्या या पुस्तकाच्या निमित्ताने थेट हत्येची धमकी देणे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करून संजय गायकवाड यांची (MLA Sanjay Gaikwad) आमदारकी रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, एकेकाळी चळवळींचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेससह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष या प्रकरणावर गप्प आहेत.नांदेडमधील विरोधी पक्षासह परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते केवळ व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मेसेज टाकून संताप व्यक्त करत आहेत, परंतु रस्त्यावर उतरून किंवा प्रशासनाला निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी अद्याप एकाही नेत्याने आंदोलनासाठी पाऊल उचललेले नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्या जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी आणि वैचारिक चळवळींना साथ दिली, तो नांदेड जिल्हा अशा गंभीर विषयावर गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे. या बातमीमुळे तरी नांदेडच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना जाग येईल का? ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार का? की  शांत राहून या '' अशा प्रकाराला मूक संमती देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: