Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

वरूड समंद चोरी

वरूड समंद येथे लग्नाच्या गडबडीत चोरट्यांचा डाव; २ लाखांवर डल्ला

Warood Samand Thieves: सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावात लग्नाच्या आनंदात असताना एका कुटुंबावर चोरीचे संकट कोसळले.


वरूड समंद येथे लग्नाच्या गडबडीत चोरट्यांचा डाव २ लाखांवर डल्ला

Warood Samand Thieves |

हिंगोली (Warood Samand Thieves) : सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावात लग्नाच्या आनंदात असताना एका कुटुंबावर चोरीचे संकट कोसळले. गुरुवारी ता. १४ रोजी सायंकाळी गावातच पार पडणार्‍या विवाह सोहळ्यासाठी गजानन पवार हे कुटुंबासह घराला कुलूप लावून गेले होते. साडेसहा वाजताच्या सुमारास घर बंद करून निघालेल्या पवार कुटुंबाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डाव साधला.

चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील साहित्याची नासधूस केली. कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. (Warood Samand Thieves) रात्री साडेसातच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाहून परतले तेव्हा घराचे तुटलेले कुलूप पाहून त्यांना धक्काच बसला. आत जाऊन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाटातील ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले.

घटनेची (Warood Samand Thieves) माहिती मिळताच पवार यांनी तात्काळ नर्सी नामदेव पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे आणि जमादार खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण केले, मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून काही ठशांचे नमुने गोळा केले आहेत. लग्नाच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अद्याप नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नाही.