Waranga- Hadgaon accident: वारंगाफाटा-हदगाव रस्त्यावर ८ एप्रिल मध्यरात्री दोन आयशर वाहनाच्या धडकेत दोन व्यक्ती ठार झाले. या अपघातातील दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन नांदेड शासकीय रुग्णालयात केले गेले.
वारंगा- हदगाव रस्त्यावर चुंचा गावाजवळ अपघात
आखाडा बाळापूर (Waranga- Hadgaon accident) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा- हदगाव रस्त्यावर चुंचा गावाजवळ ८ एप्रिल मध्यरात्रीनंतर १वाजण्याच्या सुमारास दोन आयशर वाहनांची धडक होउन या झालेल्या भिषण अपघातात बिहार राज्यातील दोघेजण जागीच ठार झाले.नांदेड शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मयत शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा ते हदगाव राष्ट्रीय महामार्गावर चुंचा शिवारात बीआर ०७ जीसी ३२५१ आणि एम एच २१ बी एच ५२७१ या दोन आयशर वाहनांची जोरात धडक झाली दोन्ही वाहने हदगाव कडून वारंगाफाटा कडे येत होती पाठीमागून धडक एवढी भिषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. या (Waranga- Hadgaon accident) अपघातात खुर्शीद आलम अब्दुल गणी (वय३६ रा.नारी दरभंगा बिहार) अमजद अली मोहम्मद अली( २६) रा.नारी दरभंगा बिहार या भिषण अपघात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, वारंगाफाटा पोलीस मदत केंद्राचे शेख बाबरभाई, प्रभाकर भोंग व शिवाजी पवार ,पिराजी बेले,अमितकुमार जाधव पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली वाहनात फसलेल्या दोन्ही मृतदेह बाहेर काढून अपघात ग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात प्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मध्यरात्री नंतर एकमेकांवर धडकून हा झालेला अपघात एवढा भिषण होता दोघांचा वाहनातच दबून मृत्यू झाला दोन्ही मृतदेह काढण्यासाठी जेसीबी आणून बाहेर काढण्यात आले. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.