Udgir Stone Pelting Case: उदगीरमध्ये दगडफेकीच्या गंभीर घटनेत शासकीय जीपचे नुकसान झाले व पोलीस कर्मचारी जखमी झाला. ४७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक पोलीस कर्मचारी जखमी; पोलीस वाहनाचे नुकसान
उदगीर (Udgir Stone Pelting Case) : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील मुसानगर परिसरात शनिवारी दि.४ एप्रिल रोज शनिवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये झालेल्या तणावातून दगडफेकीची गंभीर घटना घडली. या घटनेत शासकीय जीपचे मोठे नुकसान झाले असून एका पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तब्बल ३७ आआरोपींसह ८ ते १० अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ४७ जणाविरुध्द उदगीर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ, मुसानगर येथे काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली.दगडफेकीचे कारण समझू शकले नाही. या (Udgir Stone Pelting Case) दगडफेकीच्या गोंधळात शासकीय जीपवर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे वाहनाचे अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
तसेच, घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मार लागून तो जखमी झाला. सतीश भानुदास पवार (वय 40), पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आझम अस्लम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दूल रशीद शेख, आशा उर्फ अस्लम शेख, रोशन ताजोदीन शेख (बिलाल), मोहित जहागीरदार, जाकेर जहागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहील लाला शेख, मोईन हैदरमाव शेख, जुबेर मूसा शेख, इब्राहिम मूसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदूम मौलामाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ महमद रफी, सोहेल लाईक लददाफ, वजीर मोईदीन शेख, दस्तगीर मोईदीन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जहागीरदार, तोहिद मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालीया, मज्जू कडबेवाल, गौस हाकानी शेख, अयाज इस्माईल शेख (वाळूवाला), साहिल चांदपाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तीयाज, किशोर इश्वर मोतीराम, दिनेश धिरज कांबळे, सुमीत कांबळे यांच्यासह अन्य ८ ते १० जणांविरुद्ध अशा एकूण ४७ जनावर . या प्रकरणात गुरनं-99/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 125, 125(A), 189(2), 191(2)(3), 190, 324(3) तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 व सहकलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू ठेवला आहे.
खाकीचा वचक राहिला नाही: गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
उदगीर शहरात पोलीसाच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेच पण शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाढवळया गुन्हेगार हातात धारधार शस्ञे घेवुन फिरताना दिसत आहेत.चोर्या,मारामार्या हे तर शहरात नेहमीचेच झाले आहे.पोलीसाच्या खाकीचा वचक राहिला नसल्यानेच या (Udgir Stone Pelting Case) घटना घडत आसल्याचे बोलले जात आहे.यासाठी पोलीस प्रशासनाने कायदयाची कडक अमलबजावणी केली तर शहरातील गून्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.