Minor Girls Molestation: उदगिरात विकास नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी आशिष प्रविण घोरपडे विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
उदगीर (Minor Girls Molestation) : उदगीर शहरातील विकास नगर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.६ एप्रिल रोजी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत अर्थात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास विकास नगर येथील एका बिल्डिंगमधील एका खोलीत ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असताना आरोपी आशिष प्रविण घोरपडे हा तेथे आला,यावेळी मैत्रीण बाहेर गेल्यानंतर मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. “मला तू आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे म्हणत आरोपीने (Minor Girls Molestation) जबरदस्तीने तिच्याजवळ येऊन तिच्या मनाला लज्जा निर्माण होइल आसे कृत्य करुन विनयभंग केला.
या (Minor Girls Molestation) प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरोपीस दूर ढकलून तेथून पळ काढला.ही अल्पवयीन मुलगी घाबरलेली आसल्यामूळे तिने उशीरा हा घडलेला प्रकार घरी सांगीतला.हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पीडितेने दि.६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हा पोलीस निरीक्षक दिलीप गाडे हे करत आहेत. पिडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द फोक्सो,माहिती तंञज्ञान अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, (Minor Girls Molestation) अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.