Illegal sand transport: सेनगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत १६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एक आरोपी ताब्यात घेतला आहे.
१६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात
सेनगाव (Illegal sand transport) : तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे ४ एप्रिल रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या (Illegal sand transport) प्रकरणात फिर्यादी म्हणून महसूल विभागातील तलाठी मंगेश चंद्रभान सोरटे (सज्जा ब्रम्हवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ४ एप्रिल रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास भंडारी पाटी ते हत्ता रोडवर, बी.एस. हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी एक टिप्पर (क्र. एम एच ३८ एक्स ३७१०) सह अंदाजे चार ब्रास रेती जप्त केली. जप्त केलेल्या टिप्परची किंमत १६ लाख रुपये, तर रेतीची किंमत २० हजार रुपये ५००० रुपये प्रति ब्रास प्रमाणे अशी एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील आरोपी वैभव साहेबराव ठोंके (वय २३, रा. हानकंदरी, ता. सेनगाव) यास ताब्यात घेण्यात आले असून, आरोपी नवनाथ शेषराव राठोड (वय २४, रा. बोडखा, ता. सेनगाव) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी शासनाचा महसूल बुडवून स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना, बेकायदेशीररीत्या वाळूची चोरी (Illegal sand transport) व वाहतूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चाटसे हे करत आहेत.