Hingoli Police Crime: पुणे कात्रज येथे विवाहित पुरुषाने दुसर्या महिलेशी प्रेमाच्या कारणावरून पत्नीला मारहाण करून छळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला गेला आहे.
चाकी कार घेण्याकरीता ८ लाख रूपयाची मागणी
पुणे कात्रज येथील सासरच्या चौघावर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Police Crime) : तुझ्या सोबत मला संसार करावयाचा नाही, मी दुसर्या मुलीशी प्रेम करतो, असे म्हणुन लग्न केलेल्या पत्नीला मारहाण करून तिचा शारीरीक व मानसिक छळ केल्याने पुणे कात्रज अंजनी नगरातील सासरच्या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्नेहलचा मागील काही वर्षापूर्वी नितीन अजय पवार याच्यासोबत विवाह झाला होता. विवाह नंतर तिला काही वर्ष चांगले वागविण्यात आले. परंतु कालांतराने सासरच्यांनी चारचाकी कार घेण्यासाठी ८ लाख रुपयाची मागणी तिच्याकडे करण्यात आली. (Hingoli Police Crime) तसेच तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, मला तुझ्यासोबत संसार करावयाचा नाही, मी दुसर्या मुलीशी प्रेम करतो, असे म्हणुन स्नेहल पवार हिचा २२ मे २०२२ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यानच्या कालावधीत अंजनी नगर कात्रज रोड जि.पुणे व माहेरी साटंबा येथे शारिरीक व मानसिक छळ करून तिला थापड बुक्याने मारहाण आणि जीवाने मारण्याची धमकी दिल्याने ४ एप्रिलला हिंगोली ग्रामीण पोलिसात स्नेहल नितीन पवार हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती नितीन अजय पवार, सासरे अजय किशोर पवार, सासु रामेश्वरी अजय पवार, आत्या सासु गौरी गणेश साळूंखे सर्व रा. अंजनी नगर कात्रज जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या (Hingoli Police Crime) प्रकरणाचा पुढील तपास जमधाडे हे करीत आहेत.