Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > क्राईम जगत

परभणी डिझेल चोरी

परभणीत ट्रकमधून २३ हजाराचे डिझेल चोरी, गुन्हा दाखल

Parbhani Diesel Theft: परभणीच्या ब्राम्हणगाव शिवारात ट्रकमधून सुमारे २५० लिटर डिझेल चोरीला गेले. घटना रविवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे आणि पोलिस तपास करीत आहेत.


परभणीत ट्रकमधून २३ हजाराचे डिझेल चोरी गुन्हा दाखल 

Parbhani Diesel Theft |

 

ब्राम्हणगाव शिवारातील घटना, पांढर्‍या कारमधील अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Diesel Theft) : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्राम्हणगाव शिवारात उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २५० लिटर (२३ हजार रुपयांचे) डिझेल  चोरी केल्याची घटना रविवार १० मे रोजीच्या मध्यरात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात इसमांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि संदीप शिंदे करीत आहेत.

ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवार १० मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी निवृत्ती ज्ञानोबा दहीफळे (व्यवसाय चालक, रा. खोडवा सावरगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १० मे रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेदरम्यान परभणीतील ब्राम्हणगाव शिवारातील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एमएच ४४ यू ६९८७ क्रमांकाच्या ट्रकमधील डिझेल चोरी करण्यात आले.

अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या डिझेल टँकचे (Parbhani Diesel Theft) लॉक तोडून अंदाजे २५० लिटर डिझेल, किंमत सुमारे २३ हजार रुपये, चोरून नेले. या घटनेनंतर फिर्यादी निवृत्ती दहीफळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरून पांढर्‍या रंगाच्या कारमधील अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत.

Related to this topic: