Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

परभणी मुली अत्याचार

परभणीत नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

Parbhani girl abuse: परभणीत एका नराधम बापाने आपल्या २० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडिताने धाडस दाखवून नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


परभणीत नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

Parbhani girl abuse |

 

परभणी शहरातील संतापजनक घटना नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani girl abuse) : नात्याला काळीमा फासणारी आणि मानवतेला हादरवून टाकणारी संतापजनक घटना परभणी शहरात उघडकीस आली आहे. एका नराधम बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Parbhani girl abuse) पीडित मुलीने धैर्याने पुढे येत दिलेल्या फिर्यादीवरून नवामोंढा पोलिस ठाण्यात आरोपी बापाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील एका परिसरात ही अमानुष घटना घडली.  २६ एप्रिल रोजी आरोपी बापाने २० वर्षीय मुलीस तुला वापरण्यासाठी कपडे नाहीत. आपण नवीन कपडे घेण्यासाठी गावाकडे जाऊ असे म्हणून दुचाकीवर बसून घेऊन गेला. पाथरी रोडवरील एका शेतात नेऊन आपल्या (Parbhani girl abuse) मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार वारंवार केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. एवढेच नाही तर आरोपीने थापडबुक्क्यांनी मारहाण करुन कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीने धाडस करून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन नराधम बापाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास पोनि. महादेव मांजरमकर यांच्या आदेशाने सपोनि कदम हे करीत आहेत.

Related to this topic: