Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > क्राईम जगत

परभणी लोखंडी रॉड हल्ला

परभणीत जुन्या भांडणात तलवार, लोखंडी रॉडने हल्ला

Parbhani iron rod attack:  पालम येथील जुन्या भांडणाच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकावर तलवार, लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करण्यात आला. हि घटना पालम तालुक्यातील खोरस बस स्थानका समोर घडली.


परभणीत जुन्या भांडणात तलवार लोखंडी रॉडने हल्ला 

Parbhani iron rod attack |

 

पालम तालुक्यातील खोरस येथील घटना आरोपींवर गुन्हा दाखल 

परभणी (Parbhani iron rod attack) : पालम येथील जुन्या भांडणाच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकावर तलवार, लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करण्यात आला. हि घटना पालम तालुक्यातील खोरस बस स्थानका समोर घडली. सदर प्रकरणी १९ मे ला दोन जणांवर पालम पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बालाजी चिंतामणी खंडागळे यांनी तक्रार दिली आहे. सतिश उर्फ भैय्या हुलगीर, शेख शकिल शेख महेबुब या दोघांनी संगणमत करत फिर्यादीला जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन जिवघेण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पालम पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि नागरगोजे करत आहेत. 

जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण 
परभणी : जुना राग मनात धरत एकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. हि (Parbhani iron rod attack) घटना १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रमाबाई नगर येथे घडली. याप्रकरणी उमेश आदमाने यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शेख फरदीन याच्यावर कोतवाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील करत आहेत.