Breaking News
  • रत्नागिरी- जिल्ह्यात सीनजी सोबतच पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा
  • सीबीआयचे पथक आजही लातूरमध्ये तळ ठोकून, खाजगी कोचिंग क्लासेससह काही पालकांची देखील होणार आज चौकशी
  • NEET पेपर फुटी प्रकरणी CBI च्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचं होणार निलंबन
  • बीड मध्ये अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी विविध भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
  • NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक
  • नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आंदोलन
  • कल्याणमध्ये धक्कादायक घटना! चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला
  • शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात
  • पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

होम > क्राईम जगत

नांदगाव पेठ हत्या प्रकरण

पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Nandgaon Peth murder case: नांदगाव पेठ येथील टाकळी जहागीर येथे शुक्रवारी सायंकाळी कौटुंबिक वादामुळे पत्नीने हत्या केली. पतीने स्वतः विषारी द्रव्य खातोबद्दल आत्महत्येचा प्रयत्न केला.


पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Nandgaon Peth murder case |

टाकळी जहागीर येथील थरारक घटना

नांदगाव पेठ (Nandgaon Peth murder case) : नजीकच्या टाकळी जहागीर येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी सब्बल घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतः विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.  घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव राजकन्या अर्जुनराव सोनोने (वय ६५) असे असून आरोपी पतीचे नाव अर्जुन सोनोने (वय ७०) असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी जहागीर येथील हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोलीस सेवेत कार्यरत असून कुटुंब सुखी व समाधानी मानले जात होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पती-पत्नीमध्ये किरकोळ कौटुंबिक वाद झाला. या वादाचे रूपांतर अचानक हिंसक घटनेत झाले. (Nandgaon Peth murder case) संतापाच्या भरात अर्जुन सोनोने यांनी घरातील लोखंडी सब्बल पत्नी राजकन्या यांच्या डोक्यात घातला. गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजारी राहणाऱ्या सुनेने खिडकीतून पाहिले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिने तातडीने गावकऱ्यांना पाचारण केले. गावकरी घटनास्थळी जमा होताच आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

गावकऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता समोर रक्ताच्या थारोळ्यात राजकन्या यांचा मृतदेह पडलेला होता आणि बाजूला अर्जुन सोनोने हे पडलेले होते. दरम्यान, नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. (Nandgaon Peth murder case) मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून अर्जुन सोनोने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये अर्जुन सोनोने यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून  पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत.

टाकळी जहागीर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणातून पत्नीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.
- दिनेश दहातोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पो स्टे. नांदगाव पेठ

Related to this topic: