Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

“आई, मी वेडी होत आहे...” : मिस पुणे विजेत्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पती फरार


“आई मी वेडी होत आहे”  मिस पुणे विजेत्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू पती फरार

व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाला छळाचा थरारक प्रकार; १५ मिनिटांत घडली शोकांतिका

भोपाळ : नोएडा येथे राहणाऱ्या आणि ‘मिस पुणे’ स्पर्धेशी संबंधित असलेल्या ट्विशा शर्मा (वय ३३) या विवाहित महिलेचा भोपाळमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी ट्विशाने आपल्या आईशी फोनवर संवाद साधत मानसिक आणि शारीरिक छळाबद्दल सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात पती समर्थ सिंग फरार असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

ट्विशाचा वेदनादायी अनुभव

एका खाजगी चॅनलने असा दावा केला आहे की, ट्विशा आणि तिच्या आईमधील व्हॉट्सॲप चॅटमधून तिच्या वैवाहिक जीवनाबद्दलचे कटू सत्य समोर आले आहे. 

 

 

डेटिंग ॲपवरील ओळख, लग्नानंतर सुरू झाला छळ

एमबीए पदवीधर ट्विशा शर्मा हिची २०२४ मध्ये डेटिंग ॲपद्वारे भोपाळमधील वकील समर्थ सिंग याच्याशी ओळख झाली होती. दोघांनी डिसेंबर २०२५ मध्ये विवाह केला. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्या आयुष्यात तणाव आणि छळ सुरू झाल्याचे समोर आले आहे.

१२ मे रोजी भोपाळमधील पतीच्या घरी ट्विशाचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांच्या मते, लग्नानंतर तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात होता.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी

प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, ट्विशाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, फाशी देताना ती जिवंत असल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. तिच्या शरीरावर सूज आणि जखमांच्या अनेक खुणा आढळल्याने मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

“आई, माझं आयुष्य नरक झालं आहे...”

एका खासगी वृत्तवाहिनीने ट्विशा आणि तिच्या आईमधील व्हॉट्सॲप चॅटचा दावा केला आहे. या चॅटमध्ये ट्विशाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील त्रास उघडपणे मांडला होता.

३० एप्रिल रोजी तिने आईला मेसेज करत म्हटले होते, “आई, माझं आयुष्य नरक झालं आहे. मला इथे का पाठवलं?”

तर ७ मे रोजी तिने, “कृपया मला इथून घेऊन जा,” अशी विनंती केल्याचे सांगितले जाते.

गर्भपातासाठी दबाव, चारित्र्यावर संशय

चॅटमधून आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत. ट्विशाच्या म्हणण्यानुसार, तिच्या गर्भातील बाळावरून पतीने संशय घेतला होता आणि तिला गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आला.

९ मे रोजीच्या संदेशात तिने लिहिले होते, “तो विचारतो हे बाळ कोणाचे होते. आई, मी इथे वेडी होत आहे. मी आता हे सहन करू शकत नाही.”

शेवटचे १५ मिनिटे ठरली जीवघेणी

ट्विशाचा भाऊ मेजर हर्षित शर्मा यांनी घटनेच्या रात्रीचा घटनाक्रम सांगितला.

  • रात्री १०.०५ वाजता ट्विशा आईशी फोनवर रडत बोलत होती.
  • त्याचवेळी पती समर्थ खोलीत आल्याने तिने फोन ठेवला.
  • त्यानंतर कुटुंबीयांनी वारंवार फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
  • रात्री १०.१५ वाजता सासूने फोन उचलल्यानंतर कुटुंबीयांनी ट्विशाला तपासण्यास सांगितले.
  • रात्री १०.२० वाजता “ट्विशा श्वास घेत नाहीये,” असा फोन आल्याचा दावा करण्यात आला आहे.

उपचारात विलंबाचा आरोप

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रुग्णालय घरापासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असतानाही ट्विशाला सुमारे दीड तास उशिराने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, भोपाळ पोलिसांनी पती समर्थ सिंग याच्याविरोधात हुंडाबळी, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: