Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

कर्ता मुलगा गेल्याने दुःख

कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Hatmali Accidental Death: कळमनुरी ते बोल्डा मार्गावर दुचाकीस्वार सचिन वानोळे यांच्यावर भरधाव वाहनाने धडक दिली. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या वृध्द आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Hatmali Accidental Death |

हातमाली फाट्या जवळील घटना, अपघातात झाला मृत्यू

खानापूर चित्ता (Hatmali Accidental Death) : कळमनुरी ते बोल्डा फाटा  मार्गावर हातमाली  पाटी जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे.  13 एप्रिल रोजी  मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन  करण्यात आला आहे. घरातील एकुलता एक कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी येथील सचिन भाऊराव वानोळे (२२) याच्याकडे दोन एकर शेती असून या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सचिन हा घरातील कर्ता मुलगा असल्याने वृध्द आई वडिल त्याच्यावरच अवलंबून आहेत. रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी सचिन  हे दुचाकी वाहनावर काही कामानिमित्त हिंगोलीकडे आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ते  काम आटपून परत गावाकडे जात असतांना  कळमनुरी ते बोल्डा मार्गावर भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात सचिन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या (Hatmali Accidental Death) अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक संतोष इंगळे, जगन पवार, जमादार गजानन होळकर यांच्या  पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या सचिन यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या (Hatmali Accidental Death) अपघातानंतर या मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघातसग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत सचिन यांच्या पश्‍चात आई, वडिल, बहिण असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related to this topic: