Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > क्राईम जगत

माय-लेकाचा मृत्यू

अज्ञात ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू

Mother-child Death: सडक अर्जुनी येथे कोहमारा ते नवेगावबांध महामार्गावर ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात माय-लेकाचा मृत्यू झाला आणि पती गंभीर जखमी झाला.


अज्ञात ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू

Mother-child Death |

 

कनेरी नाल्यावरील घटना; पती गंभीर जखमी

सडक अर्जुनी (Mother-child Death) : कोहमारा ते नवेगावबांध राज्य महामार्ग क्र.११ वर भरधाव ट्रकने मोटारसायकल जबर धडक दिली. या घटनेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला. ही घटना कनेरी नाल्याजवळ आज (ता.२९) दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारासची आहे. शुभांगी पितांबर लांजेवार (३०) आणि रियांश पितांबर लांजेवार (०३) रा.कोदामेडी, ता.सडक अर्जुनी अशी मृतांची नावे आहेत. तर पितांबर लांजेवार हा जखमी झाला आहे.

सविस्तर असे की, पितांबर लांजेवार हे दुचाकी क्र.एमएच-३५/एएम-७३४८ ने नवेगावबांधकडून कोहमाराकडे जात होते. कनेरी नाल्याजवळ पोहोचताच समोरून येणार्‍या अज्ञात भरधाव ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन  निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही (Mother-child Death) धडक इतकी भीषण होती की, शुभांगी व चिमुकल्या रियांशचा जागीच मृत्यू झाला. तर पितांबर प्रकाश लांजेवार (३५) हे गंभीर जखमी झाले.

अपघात घडत ट्रक चालकाने घटनास्थळावर पसार झाला. तर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव पोलीस केंद्राचे सपोनि राजू बस्तवाडे, पोउपनि मडामी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच (Mother-child Death) मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास  सुरू आहे. घटनेत मायलेकाचा मृत्यू झाल्याने कोदामेडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: