हिंगोली अवैध दारूविक्री

हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli illegal liquor sale: हिंगोली जिल्ह्यातील एक विशेष कारवाईत अवैध दारूविक्री आणि वाहतूक विरोधात १.६५ लाख रुपये किमतीचे माल जप्त करण्यात आले. विभागाने १८० मिलीच्या बाटल्या,

हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli illegal liquor sale

हिंगोली (Hingoli illegal liquor sale) : राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने २३ ते २५ मे २०२६ या कालावधीत जिल्हाभरात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत निरीक्षक मोहन मातकर, भरारी पथक निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक हिंगोली बिट क्र. १, २, ३ यांच्या पथकाने औंढा तालुका व परिसरात अवैध मध्य विक्री व वाहतुकीविरोधात छापे टाकले. या (Hingoli illegal liquor sale) कारवाईत एकूण २१ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. 

कारवाईदरम्यान देशी मद्याच्या १८० मिलीच्या ४८५ बाटल्या, ११.५० लिटर हातभट्टी दारू आणि २ दुचाकी वाहने असा एकूण १ लाख ६५ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदीप गोणारकर, ज्योती गुट्टे यांच्यासह स. दु. नि. कांबळे, जवान आडे, राठोड, चव्हान, दिनेश राठोड, टेके, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात (Hingoli illegal liquor sale) अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहील, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत 'कॅथलॅब' रुग्णसेवेत दाखल

हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा; हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत 'कॅथलॅब' रुग्णसेवेत दाखल

Hingoli District General Hospital: सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी असून, हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत आणि सुसज्ज अशी 'कॅथलॅब' (कॅथेटरायझेशन लॅबोरेटरी)..

Nov 17, 2026
हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Hingoli District and Sessions Court: जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास न्यायालयाच्या इमेलवर  आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ पोलिस..

Nov 02, 2026
हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीतील महादेव वाडीत ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार

हिंगोलीच्या महादेव वाडीतील ५३ वर्षे पुरातन श्री तुळजाभवानी मंदिराचा २०२६ मध्ये भव्य जीर्णोद्धार; नवरात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन.

Oct 24, 2026
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्हा वार्षिक तपासणीस प्रारंभ

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्हा वार्षिक तपासणीस प्रारंभ

Hingoli District Annual Inspection: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हिंगोली जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीस  २१ ऑक्टोबर २०२६ पासून प्रारंभ झाला आहे.

Oct 21, 2026
हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

हिंगोली जिल्ह्यात चारा टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या विविध उपाययोजना

Hingoli Fodder Shortage: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Oct 19, 2026