Hingoli theft Cases: हिंगोली येथे तीन अनोळखी चोरट्यांनी औषधी व किराणा दुकानांचे शटर तोडून नगदी चोरली. सीसीटीव्हीमध्ये घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
भर रस्त्यावर चोरी करून चोरट्यांचे पोलिसांना आवाहन
हिंगोली (Hingoli theft Cases) : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील अकोला बायपास अंतुले नगर भागात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हैदोस घालून औषधी व किराणा दुकानाचे शटर फोडून चोरी करून चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चेहरे संपूर्णत: कपड्यांनी झाकले होते. ही (Hingoli theft Cases) चोरी करीत असताना चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले. चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहरा झाकलेल्या तीन चोरट्यांनी सहा दुकाने फोडली
एकीकडे हिंगोली जिल्ह्यातील चोरीच्या घटनांवर आळा घालण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाणे हद्दितील अधिकार्यांना रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील अकोला बायपास भागामध्ये ५ व ६ एप्रिल दरम्यान मध्यरात्री तीन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला. चेहरा झाकलेल्या या ३ चोरट्यांनी एका पाठोपाठ औषधी व किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून नगदी रक्कम पळविली. विशेष म्हणजे काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये ही चोरीची घटना कैद झाली. घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्यासह महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, बाळासाहेब खोडवे, वैजनाथ पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे धनंजय क्षिरसागर, संदिप जाधव यांच्या पथकाने जाऊन माहिती घेतली. (Hingoli theft Cases) त्यानंतर श्वान पथक आणि ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरी करताना हातामध्ये ग्लोज वापरल्याने चोरट्यांचा सुगावा पथकाला लागला नाही.
चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद
६ एप्रिल रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात झालेल्या चोरी संदर्भात ओम गंगाराम घोडके या व्यवसायीकाने तक्रार दिली. ज्यामध्ये तीन अनोळखी चोरट्यांनी ओम घोडके यांच्या दुकानाचे शटर व कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून नगदी ८ हजार रुपये चोरून नेले. त्याच प्रमाणे अनिल राजाभाऊ कोंडेकर यांच्या चिंतामणी औषधी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून गल्यात नगदी ४ हजार रुपये चोरून नेले. अजय अशोक मंदाडे यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून त्यांच्या गल्ल्यातील नगदी ५ हजार रुपये चोरून नेले. राहूल माणिक वाढवे यांच्या श्रेयस डिस्टीब्युटर्स या दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यातील नगदी ७ हजार रुपये चोरून नेले. विशाल सुभाष डोरले यांच्या साईलिला औषधी दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडून गल्ल्यातील नगदी ७ हजार रुपये चोरून नेले. त्याच प्रमाणे चंद्रशेखर श्रीरामअप्पा उबाळे यांच्या श्री तुळजाई औषधी दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यातील नगदी २ हजार रुपये चोरून नेले. अशा एकुण ६ दुकानामध्ये चोरट्यांनी चोरी करून नगदी ३३ हजार रुपये चोरून नेले. या गुन्ह्याचा पुढील तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.
हिंगोली शहरातही चोरट्यांची एंट्री
अकोला बायपासवर तीन अनोळखी चोरट्यांनी (Hingoli theft Cases) औषधी व किराणा दुकानाचे शटर फोडून चोरी केली. त्यानंतर या चोरट्यांनी हिंगोली शहरामध्ये देखील एंट्री केल्याचे काही सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले आहे. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आदर्श महाविद्यालय परिसरातील काही नागरीक जागे झाल्याने चोरीची घटना टळली. मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास हे चोरटे रस्त्यावरून पळत जात असल्याचे काही जणांच्या निर्दशनास आले.