Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

हिंगोली डिजे गुन्हा

पोलिसांच्या नोटीसचे उल्लंघन, डिजे वाजविल्याने पाच जनांवर गुन्हा दाखल

Hingoli DJ crime


पोलिसांच्या नोटीसचे उल्लंघन डिजे वाजविल्याने पाच जनांवर गुन्हा दाखल

Hingoli DJ crime |

हिंगोली (Hingoli DJ crime) : धर्मवीर राजे संभाजी महाराज जयंती निमित्ताने शहरामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन गुरूवारी केले होते. या मिरवणुक निमित्ताने पोलिसांनी दिलेल्या नोटीसचे पालन न करता डिजे वाजविल्याने पाच जनांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. 

१४ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक निमित्ताने पोलिसांनी दिलेल्या कलम १६८ च्या नोटीसचे पालन न करता डिजेचा आवाज कमी न करता डिजे चालू ठेवल्याने हिंगोली शहर पोलिसात भुजंग तोडेवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Hingoli DJ crime) डिजे वाहन क्रमांक एमएच १२ एफझेड ९९४१ चा चालक डिजे मालक केशव शिवाजी जाधव, डिजे वाहन क्रमांक एमएच २६ एडी०२५५ चा चालक, डिजे वाहन मालक आशिष केशव गरड तसेच आयोजक विनायक श्रीराम भिसे हिंगोली या पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास जी.आर. पोटे हे करीत आहेत.