Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

हिंगोली व्यक्ती मृत्यू

हिंगोलीत घराच्या छतावरून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

Hingoli Person Death: हिंगोली जिल्ह्यातील ४८ वर्षीय राजु नारायण नाटेकर यांनी घराच्या छतावरून पडल्याने गंभीर जखमी होण्याची घटना झाली. तात्काळ उपचारानंतर नांदेडला


हिंगोलीत घराच्या छतावरून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

Hingoli Person Death |

हिंगोली (Hingoli Person Death) : शहरातील रिसाला बाजार भागातील ४८ वर्षीय व्यक्ती घराच्या छतावरून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला असता हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार करून नांदेडला नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, राजु (मेजर) नारायण नाटेकर (४८) हे हिंगोलीतील रिसाला बाजारात वास्तव्यास होते. शहरातील विद्यार्थींनींना अ‍ॅटोद्वारे शाळेमध्ये ने-आण करीत होते. १७ मे रोजी रात्रीच्या सुमारास घराच्या छतावर गेले असता अचानक तोल गेल्याने खाली पडुन गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

याठिकाणी प्रथमोपचार करून नांदेड रुग्णालयात हलविण्यात येत होते. रस्त्यामध्ये त्यांचा (Hingoli Person Death) रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. १८ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर दुपारी अकोला रस्त्यावरील पॉवर हाऊस शेजारी स्मशान भुमित दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तिन भाऊ, भावजयी, पुतने, पुतनी असा परिवार आहे.

Related to this topic: