Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

जुगार अड्ड्यावर धाड

जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; २२ जुगाऱ्यांना ताब्यात, ₹७१.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kurkheda Gambling Raid: कुरखेडा तालुक्यातील जंगलात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून २२ जणांना अटक केली व ₹७१.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


जंगलातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड २२ जुगाऱ्यांना ताब्यात ₹७१८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kurkheda Gambling Raid |

कुरखेडा/ गडचिरोली (Kurkheda Gambling Raid) : गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत २२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ₹७१,८५,३३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा परिसरातील जंगलात एजाज शेख उर्फ कात्या हा काही इसमांना एकत्र करून ताश पत्त्यांद्वारे पैशांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या (Kurkheda Gambling Raid) माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास छापा टाकला.

२२ आरोपी ताब्यात

छाप्यावेळी (Kurkheda Gambling Raid) काही जुगारी पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत २२ आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी एजाज रफीक शेख (वय ४१, रा. कुरखेडा) आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹२,७५,२०० रोख रक्कम, ५२ ताश पत्ते (जुगार साहित्य), २३ मोबाईल फोन, १३ चारचाकी वाहने, ०६ दुचाकी वाहने, एकूण किंमत: ₹७१,८५,३३० साहित्य जप्त केले.

या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत. ही (Kurkheda Gambling Raid) कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व गोकुल राज, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धाड यशस्वी केली. ही कारवाई जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची ठोस भूमिका दर्शवणारी ठरली आहे.

Related to this topic: