Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

देवांश खुन प्रकरण

चुलती अनिताने केला सात वर्षीय देवांशचा खुन!

Devansh murder case: देवांश या मुलाचा मृतदेह दुपारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ


चुलती अनिताने केला सात वर्षीय देवांशचा खुन 

Devansh murder case |

पोलिसांची तातडीची शोधमोहीम यशस्वी

लातूर (Devansh murder case) : जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना काल सकाळी सात वाजता घडली होती. त्यापैकी देवांश या मुलाचा मृतदेह दुपारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून दुसऱ्या मुलाला शोधून काढले आणि सखोल तपास केला आणि मृत देवांश ची मारेकरी" माता न तु वैरीण" सख्खी चुलतीच निघाली. 

लातूर जिल्ह्यात चाकूरमध्ये  अंगावर शहारे आणणारी ही घटना  घडली होती. यामुळे पोलीस यंत्रणाही सक्रिय होऊन तपासाची चक्रे वाऱ्यासारखी वेगवान करण्यात आली स्वतः पोलीस अधीक्षक चाकूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून या तपासाचा छडा लावण्यासाठी बसून होते रात्री उशिरा दुसराही मुलगा लातूर येथे असल्याचे पोलिसांना समजतात पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले व कसून चौकशी सुरू केली. यावेळी चुलती अरोपी अनिता दिनेश स्वामी वय ३४ हिने शेत जमीन वाटणीच्या कारणावरून (Devansh murder case) चिमुकल्या देवांश मंगेश स्वामी या सात वर्षाच्या चिमुकल्याचा गळा दाबून निर्गुण खून केला मृतदेह लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रयत्न केले व स्वतःचा मुलगा साईचरण दिनेश स्वामी वय १० याला लातूर येथे लपवून ठेवत बेपत्ता असल्याचा बनाव घडवून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून चाकूर पोलिसात फिर्याद मंगेश चंद्रकांत स्वामी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

 फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी तपास केला. (Devansh murder case) मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच आरोपीचा व बेपत्ता मुलाचा कसून शोध घेण्याचे पोलीसांनी आवाहन पेलले आहे.