Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

औंढा नागनाथ अपघात

छोटा हत्ती व  दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी

Aundha Nagnath accident: औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर झालेल्या अपघातात छोटा हाती वाहन आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार झाले तर एकाची प्राणघातक जखम झाली


छोटा हत्ती व  दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार एक जखमी

Aundha Nagnath accident |

औंढा नागनाथ (Aundha Nagnath accident) : औंढा नागनाथ ते वसमत जाणार्‍या मार्गावर औंढा नागनाथ जवळील खांडेश्वरी देवी मंदिराजवळ छोटा हाती वाहन व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल बुधवार रोजी घडली आहे. 

या (Aundha Nagnath accident) अपघातात गजानन मंचकराव कदम (२३) रा. वगरवाडी, सुरज बाळासाहेब उबाळे (२६) रा. वगरवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत ते दुचाकी क्रमांक एमएच २२ बीजे १४९७ या दुचाकीवरून औंढा नागनाथ कडे येत होते याच दरम्यान शिरड शहापूर कडे हळदीचा कोचा घेऊन जाणारा छोटा हाती क्रमांक एमएच २६ एच ९५४६ या वाहनाचा खांडेश्वरी देवी मंदिराजवळ भीषण अपघात होऊन यामध्ये गजानन कदम, सुरज उबाळे रा. वगरवाडी तर छोटा हाती वाहन चालक नवनाथ पुरभाजी कराळे (३५) रा. डिग्रस कर्‍हाळे हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस. राहीरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार वसीम पठाण, शाहेद सय्यद, सुभाष जैताडे बबन चव्हाण, वाहतूक पोलीस वसंत चव्हाण, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, कैलास आडे, प्रमोद थोरात यांच्यासह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने (Aundha Nagnath accident) अपघातग्रस्त रुग्णासाठी मोफत सुरू असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली यानंतर आजूबाजूच्या नागरिकाच्या मदतीने अपघातग्रस्तांना तात्काळ औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून गजानन कदम व सुरज उबाळे यांना मयत घोषित केले तर नवनाथ कर्‍हाळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related to this topic: