Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

औंढा नागनाथ अपघात

औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर भीषण अपघात; ९ जण गंभीर जखमी

Aundha Nagnath accident: औंढा नागनाथ आणि जिंतूर दरम्यान पेट्रोल पंपाजवळ ऑटो पलटी होऊन ९ जण गंभीर रूपाने जखमी झाले. जखमींना तात्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर भीषण अपघात ९ जण गंभीर जखमी

Aundha Nagnath accident |

औंढा नागनाथ (Aundha Nagnath accident) : औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ ऑटो पलटी होऊन ९ गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर गोळेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ भरधाव ऑटो अचानक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २ एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे जखमीना तात्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुरुवार औंढा नागनाथ येथील आठवडी बाजार असल्याने बाजार आटोपून अनेक जण ऑटो क्रमांक एम एच ३८-४६५१ गावी परतत होते यादरम्यान चालकाचे अचानक ऑटोवरील नियंत्रण सुटले आणि पलटी खाऊन रस्त्याकडेला खड्ड्यात उभा राहिला या अपघातात परमेश्वर उत्तम नरोटे वय ३० वर्षे राहणार धार, सर्जेराव मारोतराव पोले वय साठ वर्षे राहणार माथा, परमेश्वर काशीराम कराळे वय ३५ वर्ष राहणार जांभरुण, मिथुन उत्तम व्यवहारे राहणार मौजा, राजू जालिंदर खंदारे वय २७ वर्षे राहणार नागेश वाडी, रेखा राजू सुतारे वय ४० वर्ष राहणार माथा, लताबाई विलास मुकाडे वैचारिक वर्ष राहणार संतु पिपरी, रंजनाबाई राजेंद्र कांबळे वय ४५ वर्षे राहणार माथा, गंगुबाई प्रभाकर नाईक वय ३५ वर्षे राहणार राजापूर हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, उपनिरीक्षक शेख खुदुस, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, ओंकारेश्वर रांजणेकर, वसंत चव्हाण,इक्बाल शेख, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, प्रमोद थोरात यांच्यासह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने मोफत सुरू असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली यानंतर दिगंबर गिरी, संतोष शेळके, प्रदीप गिरी यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ अपघात ग्रस्त रुग्णांसाठी  जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने मोफत सुरू असलेल्या रुग्ण वाहिकेने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे जखमीवर डॉक्टर ओमकार राठोड, डॉक्टर विना विजया, सिस्टर स्वाती इंगळे, जहाआरा पठाण, डॉक्टर भगवान पाटोळे एक्स-रे टेक्निशियन बाळू भोळे संदीप शंकर वैजनाथ आप्पा यांनी जखमेवर तात्काळ उपचार सुरू केले होते.

Related to this topic: