Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

औंढा नागनाथ जुगार

माथा येथे झन्नामन्ना जुगारावर छापा; चौघावर गुन्हा दाखल

Aundha Nagnath Gambling: माथा येथे झन्नामन्ना खेळत असलेल्या जुगार्‍यांवर औंढा नागनाथ पोलिसांनी छापा मारून चौघांना अटक केली. २११० रुपयांचा मुद्देमाल जप्त.


माथा येथे झन्नामन्ना जुगारावर छापा चौघावर गुन्हा दाखल

Aundha Nagnath Gambling |

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Gambling) : तालुक्यातील माथा येथे झन्नामन्ना खेळणार्‍या जुगार्‍यावर औंढा नागनाथ पोलिसांनी ३० मार्च रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करून २११० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औंढा नागनाथ पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून जुगार (Aundha Nagnath Gambling) खेळणार्‍या वर अचानक छापा टाकून चौघा जणांना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य व नगदी २११० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस शिपाई राजकुमार कुटे यांच्या फिर्यादीवरून दाजीबा राजाराम आंधळे, सदाशिव बाबाराव कुटे, माणिक श्रीरंग सातपुते, गजानन धोंडबाराव गीते यांच्यावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार गजानन गिरी करत आहे. पथकात पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अमोल इंगोले,जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, जयदीप जाधव, इकबाल शेख, राजकुमार कुटे यांचा समावेश होता.

Related to this topic: