Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

अंतरजिल्हा पशुधन चोरी

शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Hingoli Livestock Theft: हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला स्थानिक पोलिसांनी अटक केली. यात ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद ९ लाखांचा मुद्देमाल जप्त  

Hingoli Livestock Theft |

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची धडक कारवाई

हिंगोली (Hingoli Livestock Theft) : जिल्ह्यात शेतकऱ्यांची जनावरे चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून ९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

दि. ९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ७ वाजण्यापूर्वी यशवंत नगर, हिंगोली येथून तुलजाराम मदनलाल साहु यांच्या गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरनं. २३०/२०२६ कलम ३०३(२), ३२५ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल झाला होता. जिल्ह्यात जनावरे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हा गुन्हा गांभीर्याने घेत तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले. 

पोनि मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माधव जिव्हारे यांचे विशेष पथक नेमण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून अलांम अनिस शेख, रा. अन्सारी चौक कल्याण, मुंबई, ह.मु. लेबर कॉलनी नांदेड आणि सय्यद समीर अहमद, रा. लेबर कॉलनी नांदेड यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी हिंगोली शहर, कळमनुरी, सेनगाव व बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण ५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेली जनावरे विकून मिळालेले नगदी पैसे व गुन्ह्यात वापरलेली टोयोटा इनोव्हा कार असा एकूण ९,०४,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही (Hingoli Livestock Theft) यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि माधव जिव्हारे, पोलीस अंमलदार शेख शकील, सतीश जाधव, लिंबाजी वाव्हळे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, शंकर हराळ यांनी केली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related to this topic: