Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

अमरावती महामार्ग अपघात

अमरावती-बडनेरा अकोला महामार्गावर भीषण अपघात; ४ युवकांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

Amravati Highway Accident: अमरावती-अकोला महामार्गावर झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला आणि तीन गंभीर जखमी झाले. ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली.


अमरावती-बडनेरा अकोला महामार्गावर भीषण अपघात ४ युवकांचा मृत्यू ३ गंभीर जखमी 

Amravati Highway Accident |

अमरावती (Amravati Highway Accident) : अमरावती-अकोला महामार्ग वर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बेलोरा विमानतळ परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रकची जोरदार धडक; स्थानिकांचा प्राथमिक अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व युवक उशिरा अंदाजे रात्री अकरा वाजता (Amravati Highway Accident) बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेऊन परत जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.

चारचाकीत ७ जण; ४ ठार, ३ गंभीर जखमी 
अपघाताच्या वेळी वाहनामध्ये एकूण सात जण होते. (Amravati Highway Accident) धडक इतकी भीषण होती की चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले.

रीम्स रुग्णालयात उपचार सुरू; एकाची प्रकृती चिंताजनक
जखमींना तात्काळ रीम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती  मिळत आहे.

ट्रक चालक फरार; सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. (Amravati Highway Accident) पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मोहम्मद अनस मोहम्मद सईद (२०), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (२२), मोहम्मद अवेज मोहम्मद सईद (२६), अब्दुल अन्वेस अब्दुल सलीम (२२), हे सर्व युवक बडनेरा येथील जुनी बस्ती परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बडनेरा जुनी बस्तीमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: