हिंगोली जिल्हा रुग्णालय

हिंगोली जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव; महाराष्ट्र दिनी सत्काराची शिफारस

Hingoli District Hospital: हिंगोलीतील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मानित करण्याची शिफारस जिल्हा शल्यचिकित्सकांनी

हिंगोली जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव; महाराष्ट्र दिनी सत्काराची शिफारस

Hingoli District Hospital

हिंगोली (Hingoli District Hospital) : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गौरव करण्याची शिफारस जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, एन.आर.सी. तसेच आयुष्मान भारत डिजिटल योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सादर करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यामध्ये (Hingoli District Hospital) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचे एनआरसी व डिजिटल आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नेतृत्व, डॉ. गोपाल कदम यांचे एनआरसी विभागातील उत्कृष्ट काम, डॉ. मनीष बगडिया यांचे अस्थिरोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, डॉ. बालाजी भाकरे यांचे ई-संजीवनी सेवेत योगदान, तसेच डॉ. फैसल एस. खान यांचे मुख कर्करोग उपचार व निदान क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

याशिवाय एन.टी.सी.पी. समुपदेशक आनंद साळवे यांनी कोटपा अधिनियम २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीत केलेले कार्यही प्रशंसनीय मानण्यात आले आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026