Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

अवकाळी पाऊस नुकसान

वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू; शेतकाऱ्याचे मोठे नुकसान

Unseasonal rain damage: रिसोड तालुक्यातील चिंचाबाभरमध्ये दोन म्हशींचा वीज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी महादेव सानप यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू शेतकाऱ्याचे मोठे नुकसान

Unseasonal rain damage |

​रिसोड (Unseasonal rain damage) : तालुक्यातील चिंचाबाभर परिसरात  झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान झालेल्या वीजपातामुळे झाडाखाली बांधलेल्या दोन दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, चिंचाबाभर येथील शेतकरी महादेव सानप यांनी आपल्या म्हशी नेहमीप्रमाणे शेतात गोठ्याजवळ बांधल्या होत्या. दुपारच्या सुमारास (Unseasonal rain damage) अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी कडाडलेली वीज थेट म्हशींच्या अंगावर पडली, ज्यामध्ये दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.शेतकरी महादेव  सानप या शेतकऱ्यावर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यांच्याकडे १ हेक्टर ६० आर जमीन आहे. याबाबत महसूल प्रशासनाने पंचनामा केला आहे. यावेळी प्रशासनाने आर्थिक मदत करावी.

यासाठी गावातील तलाठी रवींद्र खंडारे, रिसोड चे पशुसंवर्धन अधिकारी अहिरे यावेळी पंचनामा करताना उपस्थित होते. यांनी यासाठी शेतकरी महादेव  सानप या शेतकऱ्याला सहकार्य करावे व मृत पावलेल्या म्हशीचा अहवाल वरिष्ठांकडे द्यावा. अशी मागणी शेतकरी महादेव सानप यांनी यावेळी केली आहे. या म्हशीचे अंदाजे नुकसान ७०-८० हजारांचे जवळपास असून दुभत्या म्हशी असल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.

Related to this topic: