Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

वर्णा शिवारात वादळाचे तांडव

वादळामुळे वर्णा शिवारातील केळी व मका लोळला; काढणीवर आलेल्या गव्हालाही बसला फटका

Unseasonal Rains Damage: खामगावच्या वर्णा व दिवठाणा शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या केळी व मका पिकांना मोठे नुकसान पोहोचविले आहे. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


वादळामुळे वर्णा शिवारातील केळी व मका लोळला काढणीवर आलेल्या गव्हालाही बसला फटका

Unseasonal Rains Damage |

खामगाव (Unseasonal Rains Damage) : सतत दोन ते तिन दिवसांपासून जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. तालुक्यातील वर्णा, दिवठाणा शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे (Unseasonal Rains Damage) नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा केळी व मका जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळी किंवा रात्री अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे या अवकाळीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरूवार २ फेब्रुवारी रोजी सुध्दा वर्णा व दिवठाणा शिवारात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये विलाससिंग इंगळे यांच्या वर्णा शिवारातील केळी जमीन दोस्त झाली आहे. अडीत ते तिन हजार केळीची झाडे पडल्याने (Unseasonal Rains Damage) मोठे नुकसान झाले आहे. तसेच दिवठाणा शिवारातील नरेंद्रसिंग इंगळे यांच्या शेतातील मका व प्रविण इंगळे यांचाही वर्णा शिवारातील शेतातील मका झोपला आहे. एकंदरित काढणीवर आलेल्या मका, गहु, ज्वारी पिकाला मोठा फटका बसला आहे.

Related to this topic: